शेतकरी मित्रांनो,
पारंपारिक शेतीचा काळ केव्हाच मागे पडलाय, हे आपण जाणताच! बदलते ऋतुमान, लपंडाव खेळणारे पर्जन्यमान, ओला- सुका दुष्काळ.... अशा कितीतरी समस्यांना सामोरे जायला आता तुम्ही चांगलेच सरावले आहात. एव्हढेच काय सिंचन, जल पुनर्भरण, सौर पंप आणि व्यवस्थापन, हरितगृहे आणि मल्चिंगसारख्या आधुनिक संसाधनांना तंत्रज्ञानाची जोड देऊन तुम्ही विपरीत परिस्थितीशी झुंज देत आहात ! कोवीड महामारीच्या काळातही कृषीक्षेत्राचा विकास दर उच्चांकी नेऊन आपण हे सिद्धच केलंय !