देणगी ही कर्तव्य म्हणून नव्हे

तर विशेषाधिकार म्हणून माना .

शेतकऱ्यांसाठी योगदान का करावे?

धामणगांवच्या भूमिपुत्रानों,
या मातीच्या खाणितून तुमच्यासारखे हीरे निपजले, याचा आम्हाला आभाळभर अभिमान आहे बघा !

आपल्या गावची नवी पिढी... शिकली...सावरली...लई मोठी झाली! कुणी डाॅक्टर्स, कुणी इंजिनियर्स झालीत! काही मुले तर विदेशातही स्थिरावली; परंतु शेतक-याचं एक तरी पोरगं सुशिक्षित शेतकरी व्हाव, आपली वडीलोपार्जीत शेती ही धनसंपत्ती आणि वडीलधा-यांचा आशीर्वाद समजून त्याने आपल्या गावाच्या मातीला कसावं , याच उद्देशाने आम्ही बालाजी फाऊंडेशन एक अभिनव संकल्पना हृदयांत घेऊन काही करायच्या प्रयत्नात आहोत.

बालाजी गृपची 30 वर्षांपासून शेतीमातीशी जुळलेली नाळ, खेडोपाडी जाऊन घेतलेला अनुभव, यातूनच या मातीची पांग फेडायला आम्ही निघालोय...
आमचा confidence 50% तर नक्कीच आहे ... आता तुम्ही हात हातात घेतलात ना , की हा संकल्प सिद्धिस जाईलच! तुमच्यावर अढळ विश्वास म्हणूनच आहे, कारण आपण या एकाच मातीची निपज ना! तुमच्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतिक्षेत... आम्ही धामणगांवकरी-
सुजीत मुंदडा
B.E.
अर्जुन भंडारी
B.E.

येथे योगदान करा

खाते नाव : आम्ही बालाजी फाऊंडेशन

खाते क्रमांक : 59209738405060

बँकेचे नाव : एचडीएफसी बँक लिमिटेड

IFSC कोड : एचडीएफसी 0004726

खाते प्रकार : करंट

बँक शाखा : धामणगाव रेल्वे शाखा

गुगल-पे / फोन-पे मोबाईल क्र. : 9738405060

देणगी खालील बाबींसाठी वापरली जाईल

  • शेतकऱ्यांचे तांत्रिक प्रशिक्षण आयोजित करणे.
  • शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे वेळोवेळी आणि अचूक हवामानाचा अंदाज कळवणे.
  • शेतीमालाचा वापर आणि उत्पादन खर्चात बचत याबाबत संदेश पाठवणे.
  • जागरूकता वाढवण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी गट बैठक, क्षेत्र पाहणी आयोजित करणे.
  • शेतकरी कार्यक्रमाद्वारे शिक्षणाचे महत्त्व समजावणे.
  • नवीन तंत्रांचें प्रात्यक्षिक.
  • मृदा परीक्षण, इ.