आम्ही बालाजी फाऊंडेशन
7/12 च्या सीमारेषांमध्ये विभागल्या गेलेल्या शेतक-यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आत्मनिर्भर करणे ही काळाची गरज आहे. शेतकरी जरी आज बांधांमध्ये विभागलेला दिसत असेल तरी त्याचा आत्मा एक आहे... तो कसत असलेली जमीन, ज्याला तो मातेसमान मानतो! भूमातेच या भूमिपुत्रांनी एकत्र येऊन नवे तंत्रज्ञान, नवे विज्ञान अवगत केल्यास, त्यासाठी आपसातली एकजूट वाढवल्यास आपल्या शेतात, आपल्या गावात, आपल्या राज्यात आणि पर्यायाने आपल्या देशात नवी कृषी क्रांती नक्कीच येणार! त्यासाठी पुढाकार घेत एका नव्या चळवळीची, नव्या मंचाची ही सुरूवात.